बी पी पोवार यांचे वयाच्या 76 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 27 : सातारा येथील शाहूपुरी जिल्हा परिषद कॉलनीचे विद्यमान संचालक श्री बी पी पोवार यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचेवर आज सकाळी संगम माहुली येथे अत्यंसंस्कार झाले.

श्री पोवार साहेब हे शाहुपुरीचे माजी सरपंच श्री भारत भोसले यांचे सासरे आहेत. पी.बी.पोवार यांचा शाहुपुरी माध्यमीक विद्यालय व जिल्हा परिषद कॉलनीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. ते धार्मिक, मनमिळाऊ स्वभावाचे व सामाजिक दृष्टीकोन असणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात दोन मुली व दोन मुलं असा परिवार आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!