
दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । सातारा । पोलीस सेवेमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस हवालदाराला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने सेबेस्टियन स्टेन मुलर वय 25 राहणार जर्मनी सध्या राहणार सातारा सर्गीस व्हिक्टर मनका रा जर्मनी सध्या रा जिल्हा कारागृह एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे तदर्थ न्यायाधीश एन एच जाधव यांनी गुरुवारी हे आदेश दिले
या खटल्यामध्ये एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले या खटल्याची हकिकत अशी सेबेस्टियन स्टेन मुलर याने 22 फेब्रुवारी 2019 रोजी सातारा जिल्हा कारागृह मध्ये कर्तव्यावर असणारे तुरुंग रक्षक रमेश व संदीप फाळके या दोन पोलिसांना झडती 17 दरम्यान उद्धट वर्तन करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती मुलर व सर्विस विक्टर मन का या दोघांवर वाई येथे गांजा लागवडीचा आरोप ठेवण्यात आला होता आरोपींचे वर्तन पाहून त्यांना जिल्हा कारागृहाच्या खोली क्रमांक 15 व खोली क्रमांक 8 येथे ठेवण्यात आले होते या आरोपींनी सदर खोलीमध्ये बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा व शौचालयाचा दरवाजा तोडून टाकत मालमत्तेचे नुकसान केले .
पोलीस हवालदार सुरेश पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणाची फिर्याद दिली होती उपनिरीक्षक मुजावर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले या खटल्याची सुनावणी तदर्थ न्यायाधीश एन एच जाधव यांच्यासमोर झाली या खटल्यामध्ये एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले या साक्षी दरम्यान समोर आलेले पुरावे आणि परिस्थितीचा विचार करून न्यायाधीशांनी संबंधित दोन्ही आरोपींना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी खटल्याचे कामकाज चालवले साक्षीदारांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावा यानुसार महेश कुलकर्णी यांनी योग्य तो युक्तिवाद केला आणि तो युक्तिवाद न्यायाधीशांनी मान्य करून आरोपींना सदर शिक्षा सुनावली .
उपविभागीय पोलिस अधिकारी आचल दलाल व सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या खटल्यासाठी विशेष परिश्रम घेतले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रोसेक्युशनस कोणचे राजेंद्र यादव शमशुद्दीन शेख सुधीर खोडे गजानन फरांदे रेहाना शेख राजेंद्र कुंभार अश्विनी घोरपडे अमित भरते यांनी या खटल्याच्या कामकाजात सहकार्य केले