स्थैर्य, सातारा, दि.१९: सातारा व परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विष प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी, जिहे, ता. सातारा येथे राजश्री महादेव शेडगे वय 25 वर्षे रा. जिहे या महिलेने विषारी औषध प्राशन केले. शेजारी राहणार्या सुरेखा फडसे या महिलेने हा प्रकार पाहताच तिने राजश्री यांच्या सासू-सासर्यांना कळवले. यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सातारा तालुका पोलिसांत झाली असून हवालदार सावंत तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत गणेश जनार्दन शिंदे रा. न्यू विकासनगर संगमनगर खेड यांनी राहत्य घरी विषारी औषध पिले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सातारा शहर पोलिसांत झाली असून तपास पो. ना. मोरे करत आहेत.