फलटण तालुक्यातील बोरीचा बार आता बंद करावा : महेंद्र बेडके

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ एप्रिल २०२३ । फलटण । सध्या नीरा देवधर व धोम बलकवडीवरून फलटण तालुक्यात दोन नेत्यांनी बोरीचा बार भरवला आहे. ह्या प्रश्नाच्या शिवाय तालुक्यात अनेक विविध कामे प्रलंबित आहेत. त्याकडे सुद्धा आता लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके यांनी केला.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत महेंद्र बेडके बोलत होते.

धोम बलकवडी व नीरा देवधरचा मुद्दा काढून तालुक्याचं राजकारण हे दोन नेत्यांच्या भोवती फिरवण्यासाठी हे काम मुद्दामून सुरू आहे. या शिवाय नीरा उजवा कॅनॉल मधून जे पाणी गळती होत आहे; त्याचे अस्थिरीकरण करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आली होती; त्यामधील 11 किलोमीटरचे कामाचे टेंडर निघण्यात आले आहे. तरी हा असणारे अस्थिरीकरण हे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात यावे, असे ही मत महेंद्र बेडके यांनी स्पष्ट केले.

नीरा उजवा कालव्याची फक्त फलटण तालुक्यातील जी गळती होत आहे; ती गळती जरी थांबविली तरी साधारण 5 ते 6 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्याचा फायदा हा फलटण तालुक्यालाच होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये हि गळती थांबवून वाचणारे 5 ते 6 टीएमसी पाणी हे तालुक्याला उपलब्ध होणार आहे. नुसतं पाण्यावर बोलून किंबहुना सोशल मीडियावर व्यक्त करून चालणार नाही. तर त्यामध्ये ठोस उपाययोजना करून वाया जाणारे पाणी वाचवून तालुक्याला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे, असेही महेंद्र बेडके यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!