
दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी चारजणांविरुध्द बोरगाव पोलिस स्टेशनमध्ये चार जणांविरुध्द गुन्ह नोंद करण्यात आला. ही घटना दि. ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता घडली.
याबाबत बोरगाव पोलिस स्टेशनमधून देण्यात आलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यात येणार आहे. ही बाब स्थानिकांकडून समजताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी जावून याबाबतची खातरजमा करुन या प्रकरणी गणेश पांडुरंग गायकवाड वय २५, सुमन पांडुरंग गायकवाड दोघे रा. हारपळवाडी ता. कराड, कल्पना उमाजी भिसे, उमाजी बजरंग भिसे दोन्ही रा. देऊर ता कोरेगाव या चार जणांवर बोरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक यादव हे करत आहेत.