स्थैर्य, सातारा, दि.१९: धोंडेवाडी, ता. सातारा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून सुमारे 1.16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडेवाडी येथील मारुती मंदिराच्या पारावर काही इसम तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती सपोनि डॉ. सागर वाघ यांना मिळाली. यावेळी सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास हवालदार बाबा महाडिक, राहुल भोये, प्रशांत मोरे, बादशाह नदाफ व गायकवाड यांनी तेथे छापा टाकला.
यावेळी गोरख गणपत घाडगे (वय 52), समाधान नारायण घाडगे (वय 43), शहाजी उद्धव घाडगे (वय 41), विलास यशवंत शिंदे(वय 58), संजय मारुती शिंदे (वय 48), सुभाष अनिल घाडगे (वय 40 सर्व रा. धोंडेवाडी, ता. सातारा), नाथाजी भानुदास पवार (वय 37, रा. वर्णे, ता. सातारा), सुरेश बाबाजी भुजबळ (वय 62 रा. अंगापूर, ता. सातारा) यांना तीन पानी जुगार खेळत असताना तेथून ताब्यात घेतले.त्यांच्याजवळून 5,390 रुपये रोख, 3 दुचाकी व 4 मोबाईल असा सुमारे 1,16,390 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.