
दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑगस्ट 2025 । फलटण । येथील हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत वितरक, बोरावके ऑटोलाईन्स यांच्या वतीने ग्राहकांसाठी ‘सर्व्हिस आणि एक्स्चेंज मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बोरावके ऑटोलाईन्सच्या शोरूम व वर्कशॉपमध्ये होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
या मेळाव्याअंतर्गत हिरो ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंगच्या मजुरीवर (लेबर चार्ज) २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच, हिरोच्या ‘जॉय राईड कार्ड’ खरेदीवर ग्राहकांना तब्बल ५० टक्के सूट मिळणार आहे.
याशिवाय, ज्या ग्राहकांना आपली जुनी दुचाकी बदलून नवीन हिरो गाडी खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी विशेष एक्स्चेंज ऑफर ठेवण्यात आली आहे. कोणतीही जुनी दुचाकी एक्सचेंज करून नवीन हिरो गाडी खरेदी केल्यास ग्राहकांना ५,००० रुपयांची विशेष सवलत दिली जाणार आहे.
ग्राहक समाधान हेच आमचे ध्येय असून, या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि आकर्षक ऑफर्स देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे बोरावके ऑटोलाईन्सतर्फे सांगण्यात आले. या चार दिवसीय मेळाव्याचा फलटण व परिसरातील जास्तीत जास्त हिरो ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ग्राहक वर्कशॉप (९६९९७८४००५) किंवा शोरूम (७०३०२२१२२३) येथे संपर्क साधू शकतात.