
दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण शहरातील जिंती नाका येथे असणाऱ्या बोरावके हिरो शोरुममध्ये हिरो मोटोकॉर्पच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, व्हिडा V2 चे दमदार लॉन्चिंग झाले.
या समारंभात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे, डीजी ऑटोमोबाइल्सचे शिरीष दोशी, कराड अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक संजय पोरे, बोरावके ऑटोलाईनच्या (हिरो) संचालिका रुपाली बोरावके, ओमकार मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संस्थापक आप्पासाहेब टेंबरे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजयराव बोरावके आणि बोरावके ऑटोमोबाईल्सचे (होंडा) संचालक हेमंत बोरावके बोरावके ऑटोलाईन्सचे (हिरो) संचालक अमर बोरावके यासारखे मान्यवर उपस्थित होते.
बोरावके कुटुंबाने वाहन व्यवसायात ३७ वर्षांचा प्रवास केला आहे. स्व. महेश बोरावके यांनी बोरावके ऑटोलाइन बाजार समितीच्या छोट्या गाळ्यात सुरू केलेला एक छोटासा सेल्स व सर्विस पॉईंट सुरू केला होता. रुपाली बोरावके यांनी या छोट्या सुरुवातीचे रुपांतर वटवृक्षात केले. त्यांनी सांगितले की, “१५ वर्षांपूर्वी भाऊंनी दाखवलेली सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर अचानक पडली. आमच्या बोरावके कुटुंबासह आमच्या टीमची मोलाची कामगिरी केली. माझ्या सासू सासरे हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. जे आमचे टीम मेंबर म्हणून बोरावके ऑनलाईन सुरू करताना वॉशिंग बॉय म्हणून आले होते ते आज सुपारवायझार, मॅनेजर झाले आहेत.”
हिरो मोटोकॉर्पची व्हिडा V2 ही गाडी तंत्रज्ञानिकदृष्ट्या अत्याधुनिक आहे. या गाडीमध्ये दोन रिम्हुवेलबल बॅटरी देण्यात आल्या आहेत. यासोबतच गाडी अगदी ३ सेकंदात ९० किमी प्रति तासाच्या स्पीडवर पोहोचू शकते. गाडीला की लेस एन्ट्री सुविधा देण्यात आली आहे, जी आधुनिक वाहनांमध्ये एक वैशिष्ट्य बनली आहे. या गाडीची प्रथम विक्री वाटप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
समारंभात अमर बोरावके यांनी सर्वांचे स्वागत केले. हिरो मोटोकॉर्पची व्हिडा V2 गाडीचे अनावरण करण्यात आले. संजय पोरे यांनी मत व्यक्त केले की, “कराड अर्बन बँकेची प्रगती सुरू आहे त्याच पद्धतीने बोरावके ऑटोलाइन्सची प्रगती झाली आहे. बोरावके हिरो हा एक ब्रँड आहे. काळानुसार बदलणे आवश्यक आहे. आता पेट्रोल डिझेल वरून इलेक्ट्रिक गाडीवर बदलण्याचा काळ आहे. हिरो कंपनीत बोरावके हिरो पश्चिम महाराष्ट्रात नंबर १ ची विक्री व सेवा देऊन नंबर १ चे काम करेल.”
आप्पासाहेब टेंबरे यांनी मत व्यक्त केले की, “फलटण मध्ये हिरो कंपनीचे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल जे लाँच केले आहे, ते नक्कीच फलटण नागरिकांना आवडेल. बोरावके शोरुम मध्ये आपुलकीने यावेसे जनतेला वाटते. बोरावके हिरो व फलटण हे एक अतूट नाते आहे. येथील स्टाफ हा विनयशील आहे.”