
स्थैर्य, फलटण, दि. 13 ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, हिरो मोटोकॉर्पचे फलटणमधील अधिकृत विक्रेते ‘बोरावके ऑटोलाईन्स’ यांनी विविध क्षेत्रांतील ग्राहकांसाठी खास ऑफर्सची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत, नवीन हिरो दुचाकीच्या खरेदीवर १००% कॅशबॅक, सोन्या-चांदीची नाणी जिंकण्याची संधी आणि इतर अनेक आकर्षक लाभ देण्यात येत आहेत.
ही विशेष योजना सरकारी कर्मचारी, सूचीबद्ध २०००+ कंपन्यांचे कर्मचारी, पोलीस व संरक्षण दलातील जवान, शिक्षक, एलआयसी कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, डिलिव्हरी रायडर्स (पोस्टमनसह) आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी लागू आहे. याव्यतिरिक्त, HDFC, ICICI आणि AXIS बँकेचे सॅलरी खातेधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या ग्राहकांना दुचाकी खरेदीवर आकर्षक डिस्काउंट आणि सुलभ फायनान्स सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिवाळीसाठी बुकिंगला सुरुवात झाली असून, स्टॉक मर्यादित असल्याने ग्राहकांनी त्वरा करावी, असे आवाहन बोरावके ऑटोलाईन्सतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहिती आणि बुकिंगसाठी, बोरावके ऑटोलाईन्स, फलटण येथे किंवा ९२८९९२२३४२ या क्रमांकावर संपर्क साधावा.