
दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
माणगंगा साहित्य परिषद पांगरी तालुका माण व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण जिल्हा सातारा आयोजित प्रकाशित पुस्तक पुरस्कार २०२२-२०२३ जाहीर करण्यात आले आहेत.
या पुरस्कारांसाठी १५८ साहित्यिकांच्या प्रकाशित साहित्यकृती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार १)व्यक्तिचित्रण- प्रबोधनाचा वसा आणि वारसा-प्रिं.डॉ. शिवलिंग मेनकुदळे २) ललित लेख- पाय आणि वाटा- सचिन पाटील ३)कादंबरी- हेळसांड- डॉ बाळासाहेब शिंदे ४) संपादित शोधनिबंध- नव्वदोत्तरी मराठी साहित्यातील विविध प्रवाह- डॉ सविता व्हटकर ५) समीक्षा संपादित- बाबूराव गायकवाड यांचे कथालेखन- डॉ कमल दणाणे ६) प्रवासवर्णन- महाराष्ट्राचे चारधाम व इतर यात्रा- सौ.सुधा लोंढे ७) वात्रटिका- पटावरची प्यादी – प्रा.शिवाजी वरुडे ८) कथासंग्रह- जाणीव- प्रा. नंदकुमार शेडगे, बाईपणाच्या उंबरठ्यावर- सौ मनाली बावधनकर ९) संदर्भग्रंथ – आदिवासी साहित्य, कादंबरी आणि स्त्री-प्रा. डॉ. मुक्ता आंभेरे १०) आत्मचरित्र- नेत्र संजीवनी- डॉ सुधीर बोकील ११) चारोळी संग्रह- हृदयस्पर्शी अक्षरवेल – सविता गोलेकर १२) चरित्र- रयतधारा- प्रा अरुण घोडके १३) गझलसंग्रह – आयुष्य पेलताना- प्रसन्नकुमार धुमाळ १४) संपादित काव्यसंग्रह- पेरणी- परशुराम लडकत १५) काव्यसंग्रह- अंतस्थ हुंकार- डॉ. शिवाजी शिंदे, मी भारतीय – डॉ सुभाष वाघमारे, अश्वस्थ- वर्षा वराडे, नाही उमगत ती अजूनही- डॉ सोनिया कस्तुरे, आई- हेमा पवार- जाधव यांना जाहीर झाला आहे.
तसेच विशेष माणगंगा साहित्यप्रेमी पुरस्कार १)एम. के. भोसले – बिजवडी २) गंगाराम कुचेकर – पुणे ३) आनंदा ननावरे- सातारा ४) सौ जयश्री माजगावकर- मेढा यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कारप्राप्त व सर्व सहभागी साहित्यिकांचे माणगंगा साहित्य परिषद पांगरी तालुका माण व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण जिल्हा सातारा व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी अभिनंदन केले आहे.