बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कैलास स्मशानभूमीच्या सेवकांना बोनस वाटप


संगम माहूली – कैलास स्मशानभूमीच्या सेवकांना बोनसचे वाटप करताना राजेंद्र चोरगे व ट्रस्टचे पदाधिकारी.

स्थैर्य, सातारा, दि.16 ऑक्टोबर : येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळीच्या निमित्ताने संगम माहूली येथील कैलास स्मशानभूमीच्या सेवक वर्गाला 1 पगार आणि दिवाळी साहित्याचे किट बोनसचे वाटप नुकतेच करण्यात आले.
राजेंद्र चोरगे म्हणाले, कैलास स्मशानभूमीची देखभाल रात्रंदिवस जे कर्मचारी करतात. स्मशानभूमीची दैनंदिन स्वच्छता ठेवतात. त्यांच्या सेवेमुळे आज कैलास स्मशानभूमीमध्ये कोठेही घाणीचे साम्राज नाही. या कर्मचार्‍यांना त्यांच्या कुटुंबासह दिवाळी आनंदात साजरी करता यावी म्हणून कर्तव्य भावनेतून श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट्रच्यावतीने बोनस म्हणून एक महिन्याचा पगार व दिवाळीचे साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे करण्यात आला. सेवकांच्या सुखदु:खात ट्रस्ट कायमच पाठीशी उभा असतो.

या सेवकांचे आर्थिक जीवन सुधारावे आरोग्यदृष्टीने भविष्य उज्वल होण्यासाठी इएसआय, एसआयपी खाती सुरू केलेली आहे. तसेच त्यांना दर महिन्याला धान्य, युनिफॉर्म दिले जाते तसेच कर्मचार्‍यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली जाते.

यावेळी श्री बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, संजय कदम, जगदीश खंडेलवाल, अंबाजी देसाई, उदय गुजर, नितीन माने, दीपक मेथा, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे, जयदीप शिंदे, अर्जुन चोरगे, पीयुष खंडेलवाल, श्रावण पाटील, संजय केंदे आणि 8 सेवक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!