
स्थैर्य, दि.२७: कोरोनामुळे मार्चपासून सिनेमागृहे बंद आहेत. देशात मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन व्यवसायाचे ९,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असोसिएशनने सिनेगृहे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणला आहे. मल्टिप्लेक्स असो. व केंद्र सरकारमध्ये अनेक टप्प्यांच्या चर्चेनंतर दसऱ्यापर्यंत सिनेगृहे सुरू होण्याची आशा आहे.
बॉलीवूडचे नुकसान पुढील वर्षी येणारे चित्रपट भरू शकतात. निर्माते व ट्रेड अॅनालिस्ट गिरीश जोहर म्हणाले, २०२१ मध्ये बड्या कलाकारांचे चांगल्या पटकथेचे १६ चित्रपट येतील. त्यातून ४ हजार कोटींच्या कमाईची आशा आहे. मल्टिप्लेक्स चेन कार्निव्हलचे सीनियर व्हाइस प्रेसिडंट कुणाल साहनी म्हणाले, ‘सणासुदीला चित्रपटांची मांदियाळी असते. मात्र, यंदा कोरोनामुळे संपूर्ण वर्ष वाया गेले. ऑक्टोबरमध्ये सिनेगृहे उघडण्याची आशा आहे. लटकलेल्या चित्रपटांची कामे वेगाने पूर्ण होत आहेत. बॉलीवूड २०२१ ची तयारी करत आहे. यामुळे पुढील वर्षी सणासुदीला चित्रपट प्रदर्शनाची धुमाळी असेल. देशात ९,००० पैकी २६०० स्क्रीन मल्टिप्लेक्सच्या आहेत. यात पीव्हीआर, आयनॉक्स, कार्निव्हल व सिनोपोलिस या ४ मोठ्या कंपन्या आहेत. यंदा वर्षअखेरीस ८३, सूर्यवंशी, हॉलीवूडचा नो टाइम टू डाय, डिस्नेचा बहुप्रतीक्षित मुलान आणि वार्नर ब्रदर्सच्या टेनेट चित्रपटांपासून मोठ्या आशा आहेत. मूव्ही मार्टिंग कंपनीचे अश्वनी शुक्ला म्हणाले, भारतात दरवर्षी सुमारे १००० पैकी ३०० चित्रपटांनाच सिनेगृहे मिळतात. ओटीटीवरील शकुंतला देवी, गुंजन सक्सेनासारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले. यामुळे आता सिनेगृहांसाठीच चित्रपटाची तयारी केली जात आहे.
म्हणाले, भारतात दरवर्षी सुमारे १००० पैकी ३०० चित्रपटांनाच सिनेगृहे मिळतात. ओटीटीवरील शकुंतला देवी, गुंजन सक्सेनासारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले. यामुळे आता सिनेगृहांसाठीच चित्रपटाची तयारी केली जात आहे.
व सिनोपोलिस या ४ मोठ्या कंपन्या आहेत. यंदा वर्षअखेरीस ८३, सूर्यवंशी, हॉलीवूडचा नो टाइम टू डाय, डिस्नेचा बहुप्रतीक्षित मुलान आणि वार्नर ब्रदर्सच्या टेनेट चित्रपटांपासून मोठ्या आशा आहेत.