‘श्री दत्त इंडिया’ साखरवाडी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२१ । फलटण । साखरवाडी ता. फलटण येथील श्री दत्त इंडिया प्रा. लि. कारखान्याच्या तिसऱ्या सन २०२१ – २०२२ सालच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटणचे अध्यक्ष महंत विद्वांस श्यामसुंदर शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर दि.१ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.

परिसरातील शेतकरी, राजकीय कार्यकर्ते व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक जितेंद्र धरु, चेतन धरु, परीक्षीत रुपारेल, कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजित जगताप, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब भोसले, संतोष भोसले, महेश भोसले, पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर व रेश्मा भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, सागर कांबळे, संजय भोसले, रमेश बोन्द्रे, युनिटी बिल्डटेकचे नाईक निंबाळकर उपस्थित होते.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!