जमीन दस्त नोंदणीसाठी बोगस इसम, साक्षीदार केले उभेसातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.२९: नेले, ता. सातारा येथे कुळकायद्याने मिळालेल्या जमिनीच्या विक्री प्रमाणपत्र नोंदणीसाठी बोगस इसम व साक्षीदार उभे केल्याची तक्रार सहहिस्सेदार रामदास गुलाबराव जाधव यांनी दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सातारा दुय्यम निबंधक कार्यालयातही याची सुनावणी होवून या दस्त नोंदणीसाठी बोगस इसम उभे केल्याचा पुरवणी जबाब कार्यालयाने दिला आहे. चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव, अनोळखी इसम व छबुताई दशरथ निकम यांच्याविरोधात ही तक्रार देण्यात आली होती.

याबाबत माहिती अशी, दुय्यम निबंधक कार्यालयास दि. 04 डिसेंबर 2019 रोजी रामदास गुलाबराव जाधव रा. नेले पो.किडगाव यांनी तक्रार अर्ज केला होता. त्यात नमुद केले होते की, नेले येथील गट नं. 611 मध्ये ते सहहिस्सेदार असून ती जमीन कुळ कायद्याने मिळाली आहे. या मिळकतीच्या 7/12 उतार्‍यावर सह हिस्सेदार मारुती यदु पवार, मधुकर यदु पवार व छबुबाई दशरथ निकम होते. जमिन कुळ कायद्यातील असल्याने 32 एम विक्री प्रमाणपत्र नोंदणी घेणे आवश्यक असते. याकामी सहा. दुय्यम निबंधक वर्ग-2 सातारा क्र.1 यांच्यासमोर मारुती यदु पवार ऐवजी अनोळखी बोगस इसम व मधुकर यदु पवार ऐवजी नेले गावातील जगन्नाथ गणपती जाधव यांना उभे करुन जबाब दिले गेले. या बोगस व्यक्तींना दस्त नोंदणी करतेवेळी संगणकावर फोटो घेवून ओळख पटवून देणारे व साक्षीदार म्हणून चंद्रकांत सदाशिव धोत्रे व महादेव गुलाब जाधव दोघे रा. नेले होते. तसेच दस्त नोंदणीवेळी मारूती व मधुकर यदू पवार यांची बहिण व सहहिस्सेदार उपस्थित असताना देखील जाणीवपूर्वक फसवणूक करण्यास तिने मदत केली आहे. त्यामुळे चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव व अनोळखी इसम, छबुबाई दशरथ निकम या सर्वांनी संगनमताने बनावट दस्ताची नोंदणी केली असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

तक्रारदार रामदास गुलाबराव जाधव यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक कार्यालयात सुनावणी केली असता तत्कालीन सहदुय्यम निंबधक व शासनाची फसवणूक केली असल्याचे दिसून आले. त्यामुळे सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या याबाबतच्या गुन्ह्यात सध्याचे सहादुय्यम निबंधक वर्ग 2 यांनी पुरवणी जबाब दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!