वीर धरण कालव्यात आढळला चेहरा रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह; पुरंदर तालुक्यातील युवकाचा घातपात झाल्याचा संशय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०९: पिंपळे, पोमणनगर, ता. पुरंदर येथील मंगेश सुरेंद्र पोमण वय अंदाजे 30 ते 40 या इसमाचा मृतदेह वाठार बुद्रुक ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये वीर धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये पाण्यात मंगळवारी आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पुढील तपास सुरु केला. यावेळी मृतदेहाचा चेहरा रक्ताने माखलेला व चेहर्‍यावर जखम असल्याने घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

या घटनेबाबत लोणंद पोलीस स्टेशन मधुन मिळालेली आधिक माहिती अशी की मंगळवारी लोणंद पोलीसाना वाठार बुद्रुक ता खंडाळा गावच्या हद्दीमधे वीर धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये पाण्यात अंदाजे 30 ते40 वय असणार्‍या अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिकाडुन मिळाली होती, ही माहिती मिळताच लोणंदचे सपोनि विशाल वायकर यांनी सहकार्‍यासह घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा करुन मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंदात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला, या
मृतदेहाचीची ओळख पटवण्यासाठी व या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी पथके तयार करुन लोणंद पोलीसानी पुढील तपास सुरू केला होता, तपासाअंती सदर मृतदेह पिंपळे पोमणनगर ता पुरंदर जिल्हा पुणे येथील मंगेश सुरेद्र पोमण यांचा असल्याचे उघड झाले असुन मृतदेहाच्या चेहर्‍यावर जखम असुन चेहरा पुर्ण रक्ताने माखलेला असल्याने घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!