जीवन जगत असताना कायमच आनंदी असावं. झुरतं कुढतं जगण्यापरीस मुक्तपणे जीवनाचा भरभरुन आनंद घ्यावं अन् द्यावा .
त्यासाठी जीवनाचे दोन नियम आचरणात आणावेत.
सदा बहरणे फुलांसारखं असावं. पसरावे वा-यासवे सुगंधासारखे.
कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो.
आपल्या सानिध्यातील प्रत्येकाला आपणाकडून हेवा वाटावा असाच सहवास असावं. नुसत्या सहवासाने त्यांच डोंगरा एवढं दुःख चुटकीसारखं हलकं व्हावं. त्याला आपल्यातील उणिवाची जाणिव व्हावी. त्याच्या जगण्याला आपल्या सोबती संगतीने बहर यावा.
आपण सुद्धा प्रत्येकांकडून चांगुलपणाचा ताटवा घ्यावा.
आपल्याच सहवासात – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१