

स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : गिरवी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये गुरुवारी पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत, येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्याने चमकदार कामगिरी केली आहे.
इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या रुद्र वीर गणेश खटके याने १४ वर्षे वयोगटातील ५२ किलो वजनी गटामध्ये प्रतिस्पर्धकांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयासह त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रुद्र खटके याने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्वर अप्पाजी गावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग-१) श्री. संभाजी गावडे आणि संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
रुद्रला कुस्तीचे मार्गदर्शन करणारे शाळेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे यांच्यासह उपप्राचार्य सौ. पूनम जाधव, मॅनेजर सौ. सोनाली मोरे आणि सर्व शिक्षक वर्गानेही रुद्रचे कौतुक करून त्याला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.