स्थैर्य, फलटण : गुणवरे, ता. फलटण येथील ईश्वरकृपा शिक्षण संस्था संचलित ब्लुम इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर काॅलेज ला नुकतेच ISO 9001: 2015 मानांकन प्राप्त झाले आहे. ईश्वर कृपा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर काॅलेज गुणवरे सारख्या ग्रामीण भागात सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे शिक्षणाच्या सर्व सुविधा पुरवून ग्रामीण भागातील विद्यार्थी सक्षम करण्याचे काम केले जात आहे. शिक्षणाच्या उत्तम दर्जामुळे पालक व विद्यार्थीचा कल या शाळेकडे आहे. ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या या यशाबद्दल शाळेचे अभिनंदन होत आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे सचिव सौ. साधना गावडे यांचे पालक, ग्रामस्थ आदीं मधून अभिनंदन होत आहे. या सोबतच ब्लूम ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर काॅलेज मध्ये या वर्षी पासून करोना या आजारामुळे ऑनलाईन शिक्षण देणार असून तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिलीच शाळा अशी आहे कि, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम करणार आहे.
कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकेल, मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. याचीच दाखल घेऊन ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर काॅलेज यांनी झूम अँप द्वारे ऑनलाईन शिक्षण देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. व आपल्या शाळेमधील विद्यार्थांना करोना या महाभयंकर आजाराची लागण होवू नये म्हणूनच ओनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर काॅलेज मार्फत घेण्यात आलेला आहे, अशी माहिती संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे यांनी दिली.
शाळा सुरु करण्यासाठी आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल, गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदि कामे केली जातील. गटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातली भीती कमी करण्यात येईल. बाल रक्षक व शिक्षकांनी शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेल्या तसेच स्थलांतरितन मजुरांच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवायचे आहे, सरल प्रणाली अद्ययावत करणे व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे, ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ यांची व्यवस्था करणे जेणे करून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी याची मदत होईल, झूम क्लास रूम, वेबिनार डिजिटल प्रायोगिक तत्वावर सुरु करणे, ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल एपचा उपयोग, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देत राहणे अशा बाबींचे पण नियोजन ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर काॅलेजच्या वतीने करण्यात आलेले आहे.