दैनिक स्थैर्य | दि. १७ जानेवारी २०२५ | फलटण |
ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे येथील विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री व इंटरमीडिएट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लावलेला आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन, मुंबई यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एलिमेंट्री परीक्षेमध्ये ब्लूम शाळेतील कु. सोनिया प्रल्हाद निकम (इयत्ता नववी), कु. दिया चंद्रसेन मिंड (इयत्ता आठवी), कु. आदिती बरमा शेडगे (इयत्ता नववी), कुमारी सृष्टी शिवदास देवकुळे (इयत्ता आठवी) उत्तीर्ण झालेल्या आहेत. तसेच इंटरमीडिएट परीक्षेमध्ये इयत्ता दहावीतील मनस्वी भोसले, सिद्धी राठोड, सिद्धी अब्दागिरी उत्तीर्ण झाल्या आहेत.
यावर्षी दोन्ही परीक्षेला एकूण सात विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक ग्रेड (१), बी ग्रेड (३), सी ग्रेड (३) विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना सौ. आशा धापटे, कु. सुकन्या पवार यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्वर तात्या गावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग १) श्री. संभाजी गावडे, संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे, प्राचार्य श्री. गिरिधर गावडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
पहिल्याच वर्षी चित्रकलेच्या एलिमेंट्री व इंटरमीडिएट परिक्षेमधील उत्तुंग यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.