दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । बारामती । जळोची येथील प्रेरित फाउंडेशन व श्री संत सावता माळी तरुण मंडळा च्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 115 जणांची रक्तगट तपासणी करण्यात आली. रक्तगट तपासणीचे अभियान यापुढे असेच चालू ठेवण्यात येणार असल्याचे प्रेरित फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर जमदाडे यांनी सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महेश साळुंके, डॉ. संतोष शिंदे, डॉ. गीतांजली शिंदे, निखिल होले, पांडुरंग कुदळे, विजय जमदाडे, दादासाहेब दांगडे, विजय फरांदे, धनंजय जमदाडे, नवनाथ जमदाडे, संदीप जमदाडे, आदित्य जमदाडे, श्रीरंग जमदाडे, आकाश जमदाडे, तुषार जमदाडे, भाऊ बनकर, संदीप कुदळे यांनी मेहनत घेतली. रक्तगट तपासणी शिबिराकरिता अष्टविनायक लॅबरोटरीचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी सर्व उपस्थितांचे आभार प्रेरित फाउंडेशनचे सचिव महेश साळुंके यांनी मानले.