दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । बारामती । रक्तदान दान हे सर्व श्रेष्ठदान असून त्यामध्ये कोणताही भेदभाव नाही सर्व धर्म जाती साठी एकच रक्त उपयोगात येते त्यामुळे रक्तदान ही चळवळ होणे साठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष व जिल्हा बँक संचालक संभाजी होळकर यांनी केले. १ मार्च महाशिवरात्र व युवा नेते जय अजित पवार आणि श्रीरंग जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जळोची येथे श्रीरंग जमदाडे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी संभाजी होळकर बोलत होते. यावेळी बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,पुणे जिल्हा ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष नितीन शेंडे,बारामती नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव,महिला बाल कल्याण समिती च्या सभापती आशा माने,नगरसेवक अतुल बालगुडे,व दीपक मलगुंडे प्रशांत भोईटे,प्रताप पागळे,अर्जुन पागळे,जगन्नाथ हिंगणे,दत्तात्र्य माने,महादेव चौधर,भिवा मलगुंडे आदी मान्यवर उपस्तीत होते श्रीरंग जमदाडे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून क्रिकेट,श्रीनाथ म्हसकोबा मंदिर मधील विविध कार्यक्रम ,सावतामाळी मंडळ च्या माध्यमातून युवकाचे संघटन उत्कृष्ट असून स्वतः च्या व जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे सचिन सातव यांनी सांगितले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीरंग जमदाडे यांनी स्वागत केले प्रास्ताविक धनंजय जमदाडे व सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार आदित्य जमदाडे यांनी मानले. श्रीनाथ म्हसकोबा ट्रस्ट,सावतामाळी तरुण मंडळ, काळेश्वर तरुण मंडळ च्या कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या प्रसंगी १०१ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आल्या.