रक्तदान ही चळवळ व्हावी : प्राजक्ता गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । बारामती । रक्तदान हे माणुसकीचे महान नाते त्यास धर्म,जात, पंथ भेदभाव नाही आहे,त्याचे प्रस्थ वाढले पाहिजे व सामाजिक भावनेतून रक्तदान ही चळवळ होण्यासाठी युवकांचा पुढाकार म्हतपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितले. शुक्रवार २१ जुलै रोजी अजितदादा युथ फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं.

याप्रसंगी प्राजक्ता गायकवाड बोलत होत्या यावेळी शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठलराव काटे,मा जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष संभाजी  होळकर,प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव गणेश जगताप, अमोल काटे, शशिकांत चौधर, प्रताप पागळे ,संतोष सिंग व इतर मान्यवर उपस्तीत होतेरक्तदान शिबीर, वृषरोपण, वन्य जीवासाठी पाणवठे, राज्यात कोठेही रक्त उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा राबविणे आदी कार्याच्या माध्यमातून अजितदादा युथ फौंडेशन नी आदर्शवत कार्य केल्याचे शरयू फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी सांगितलेरक्तदान साठी होत असलेले कार्य ही बाब म्हतपूर्ण असून आदर्श समाज निर्मितीसाठी याची नितांत गरज असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठलराव काटे यांनी सांगितले.अपघात झाल्यावर किंवा ऑपरेशन वेळी कोणाचाही मृत्यू केवळ रक्त भेटले नाही म्हणून होऊ नये यासाठी फौंडेशन दक्ष असते म्हणून कोणत्याही वेळी कोणासही राज्यात रक्त उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अजितदादा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले.या प्रसंगी विविध क्षेत्रात व रक्तदान साठी विशेष कार्य  केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला व  विनायक जाधव लिखित ‘आदर्श प्रेरणादायी वाटचाल’  या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील तर स्वागत राहुल चौधर, सचिन घाडगे, अरविंद काळे, ओंकार महाडिक व इतर पदाधिकारी यांनी केले आभार दत्ता माने यांनी मानले.या प्रसंगी  विक्रमी ३११२ बाटल्या रक्तसंकलीत करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!