रक्तदान हेच श्रेष्ठ दान : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २१: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उपक्रमांवर बंधने असली, तरी आपत्ती काळातील गरज ओळखून विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम नगरसेवक सनी अहिवळे व हरीश काकडे यांनी राबविला आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून रक्तदानाचा उपक्रमातून सनी अहिवळे व हरीश काकडे यांनी समाजात अव्वल स्थान मिळवल्याचे गौरवोद्‌गार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.

फलटण संस्थान अधिपती तथा महाराष्ट्र विधानपरिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण मेडिकल फाऊंडेशन संचलित येथील रक्तपेढीच्या सहकार्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन मंगळवार पेठ फलटण येथे २१ एप्रिल २०२१ रोजी रक्तदान शिबिर नगरसेवक सनी अहिवळे व हरीश काकडे (आप्पा) यांनी आयोजित केल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दोघांचेही आभार मानले. कोरोनाच्या काळामध्ये समाजाची गरज ओळखून आयोजित केलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद असल्याचे नमूद करत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर शिबिराच्या यशस्वी आयोजन तसेच उत्तम नियोजनाबद्दल सर्वांचे आभार मानले.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर यांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिराचे आयोजन नगरसेवक तथा आरोग्य सभापती सनी संजय अहिवळे तसेच हरीश काकडे, संग्राम अहिवळे, अक्षय अहिवळे यांनी केलेले होते. या रक्तदान शिबिरास शक्ती भोसले, सनी काकडे, शिवा अहिवळे, प्रवीण काकडे (स) आदी मान्यवरानी शिबिरास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!