
दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025 ।फलटण । येथील शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान फलटण विभागाच्यावतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त रविवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत महाराजा मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सहभागी रक्तदात्यास विजयराव देशमुख लिखित शककर्ते शिवराय ही कादंबरी भेट देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9503657933, 9890182282, 9096608061, 9975970957 या मोबाईलवर संपर्क साधावा.
या शिबीरात धारकरी, ग्रामस्थ व शिवशंभू भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान यांच्यावतीने करण्यात आले आहे.