विद्या प्रतिष्ठान माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । बारामती । विद्या प्रतिष्ठानच्या माजी विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमिक शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून सामाजिक बांधिलकी व रक्ताचा तुडवडा जाणवत असल्याने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवार दि. ०६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त व बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलिमा गुजर, सदस्य डॉ. राजीव शहा, सदस्य किरण गुजर, विशाल कोरे
विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे, उपमुख्याध्यापक अर्जुन हिवरकर, पर्यवेक्षिका संगीता साठे, पर्यवेक्षक प्रकाश यादव तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरज चौधर, प्रकाश कोरे, यशवंत चांदगुडे, सौ. रत्ना पाटील, सौ. स्वाती मलगुंडे आदी मान्यवर उपस्तीत होते.

विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून सदर माजी संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. माजी विद्यार्थी संघटनेचे सुरज चौधर, कु. ऋतुजा पागळे, कु. आफरीन खान, विशाल जगताप, अनिल चौधर, किशोर सावंत, शरद चौधर, राहुल सोन्ने, अमर घाडगे, सौ. मंजू यादव, सुनील चौधर, धीरज चौधर, सचिन चौधर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केलेले होते. या शिबिरामध्ये तब्बल 275 जणांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला.


Back to top button
Don`t copy text!