
पवारवाडी – रक्तदान शिबिर प्रसंगी आयुक्त अविनाश शिंदे, संचालक पृथ्वीराज घोलप व इतर.
स्थैर्य, बारामती, दि. 3 सप्टेंबर : रक्ताला कोणताही धर्म जात नसते, मानवी जीवनातील माणुसकी जपणारे सर्वोच्च दान म्हणजे रक्तदान आहे त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असल्याचे प्रतिपादन गुलबर्गा महानगरपालिकेचे आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले.
पवारवाडी, ता. बारामती येथील शिवतेज तरुण मंडळाच्या रोप्य महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी उद्योजक शीतल शिंदे, वालचंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, छत्रपती कारखान्याचे संचालक पृथ्वीराज घोलप, पवारवाडी चे सरपंच अनिल शिंदे, अॅड प्रतिमा भरणे, प्रियंका भरणे, तुषार करकरे, रामदास करकरे ,हर्षल करकरे, अतुल करकरे ,सचिन करकरे, शिरीष करकरे, साक्षात काळे, दत्तात्रय शिंदे ,विशाल हरिहर, रोहित काळे, अमोल पवार, विठ्ठल काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर ही काळाची गरज असून रक्तदान ही चळवळ व्हावी अशी अपेक्षा आयुक्त अविनाश शिंदे यांनी केली. सामाजिक बांधिलकी व सामाजिक भान जोपासत गणेशोत्सवाच्या माध्यमातून जातीय सलोखा, बंधुता, एकोपा वाढीस लागावा म्हणून शिवतेज गणेशोत्सव तरुण मंडळाच्या माध्यमातून कार्य करत असल्याचे शीतल शिंदे यांनी सांगितले. या वेळी 75 तरुणांनी रक्तदान केलेल्या तरुणांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.