
स्थैर्य, फलटण, दि. २२ : फलटण येथील ब्लड बँकेमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सन्मती सेवा दलाच्या वतीने दि. २५ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन फलटण ब्लड बँकेत केलेले आहे.
रक्तदान शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे. ज्यांनी गत 28 दिवसांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे. त्यांनी रक्तदान करू नये व रक्तदान करताना कोरोना बाबतची त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन सन्मती सेवा दलाच्या वतीने करण्यात आलेले आहे.