दैनिक स्थैर्य । दि. ७ मे २०२२ । फलटण । जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व वाई लिंगायत मठाचे अध्यक्ष श्री. ष. ब्र. १०८ सदगुरु महादेव शिवाचार्य महाराज यांच्या प्रवचनास फलटणकरांचा मोठा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त फलटण मध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व श्री सदगुरु महादेव शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर हिंदू लिंगायत विचार मंचचे शरद गंजीवाले, आहार तज्ञ सौ. मनीषा अंबूपे, फलटण वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष नंदकुमार स्वामी. फलटण रक्तपेढीचे डॉ. श्रीकांत करवा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सद्गुरु महादेव शिवाचार्य म्हणाले, बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर हे महान क्रांतिकारक संत होते त्यांनी समाजाला समतेची वागणूक दिली. स्त्री-पुरुष समान आहेत असे सांगून महिलांना व्यासपीठावर विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. सध्या सर्वांनी आपल्या धर्माचे आचरण करणे गरज असून धर्माच्या आचरणाने शक्ती वाढते धर्म सोडला तर समाज अधोगतीला जावून आपणही संपून जाऊ म्हणून सर्वांनी आपल्या धर्माचे आचरण करावे.
आपल्या मुलांच्यावर आपल्या धर्माचे संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची असून पालकच संस्कारित असतील तरच ते आपल्या मुलांवर संस्कार करू शकतील. लिंगायत म्हणून घेताना गळ्यामध्ये लिंग व कपाळी भस्म असणे गरजेचे आहे.
देव दगडात किंवा देवळात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हा देव कळण्यासाठी आपण मानवतेची पूजा करण्याचे गरजेचे आहे. आपण सर्व अंधश्रद्धा विरहित शैव धर्माचे पाईक आहोत याचा अभिमान ठेवून महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचाराने आपले जीवन मार्गक्रमण करणे हीच खरी महात्मा बसवेश्वर जयंती आहे.
यावेळी शरद गंजीवाले यांनी लिंगायत समाज आणि जनगणना याविषयी माहिती दिली तर सौ. मनीषा अंबूपे यांनी आपला आहार व जीवन या विषयावर मार्गदर्शन केले.
महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन झाल्यानंतर रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रशांत बहिरट, डॉ. मंदार शिपटे, डॉ. गावडे, राजेंद्र रणसिंग शशिकांत मेनकुदळे यांनी केले. त्यानंतर रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी केले, प्रास्ताविक विशाल आंधळकर यांनी केले, कु. आकांक्षा होनराव यांनी लिंगाष्टके सादर केली, पाहूण्यांची ओळख सौ. सुजाता मेनकुदळे यांनी करून दिली, स्वागत श्रीकांत गाडे, शिवाजी गाडे, चंद्रकांत मेनकुदळे, संदीप बिडवे, संजय शिपटे, संतोष महाजन व राहुल उदांडे शिवप्रसाद नडगिरे यांनी केले तर आभार रणजीत शेटे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सुनील बिडवे, देवेंद्र जंगम, सतीश स्वामी, अमोल हंपे, तानाजी करळे, विजय गाडे, अड राहुल सतुटे, सुशील बाजारे, राहुल वीर, सुनील नकाते यांनी केले. कार्यक्रमास वीरशैव लिंगायत समाजातील बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.