संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त २ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर


दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त फलटण नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने २ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन फलटण नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष करण भांबुरे यांनी केले आहे.

फलटणमधील बारामती चौक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरात दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. प्रत्येक रक्तदात्यास खास आकर्षक भेटवस्तूही यावेळी देण्यात येणार आहे. सर्वांनी या रक्तदान शिबिरास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत उर्फ मुळे यांनी केले आहे.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे, उपाध्यक्ष मृणाल पोरे, संत नामदेव महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा टाळकुटे, उपाध्यक्षा सौ. अंजली कुमठेकर तसेच विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय उंडाळे, नासपचे सचिव मनीष जामदार, शेखर हेंद्रे, महेश हेंद्रे, सुनील पोरे, राहुल जामदार, अ‍ॅड. राहुल टाळकुटे, महेश उरणे, मधुकर मुळे, सुलभा मोहटकर, रेखा हेंद्रे यांच्यासह विठ्ठल मंदिराचे ट्रस्टीज, महिला मंडळाचे पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!