दैनिक ‘लोकमत’ च्यावतीने फलटण येथे रक्तदान शिबीर संपन्न; क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मायभूमी फाउंडेशनच्यावतीने रक्तदात्यांना आरोग्य कीटचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । फलटण । दैनिक ‘लोकमत’ वृत्तपत्राच्यावतीने फलटण येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मायभूमी फाउंडेशनने सक्रिय सहभाग दर्शवताना रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य कीट देऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे आणि फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.नीताताई नेवसे यांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मायभूमी फाउंडेशन या दोन सामाजिक संस्थांची स्थापना सामाजिक भावनेतून केली असून या संस्थांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. ‘लोकमत‘ तर्फे येथील महाराजा मंगल कार्यालय मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी प्रत्येक रक्तदात्यास क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व मायभूमी फाउंडेशन तर्फे स्टॉल उभारून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य कीट देण्यात आले. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवाश, विटामिन सी च्या गोळ्या याचा समावेश होता.

या स्टॉलला फलटण प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, आयुर उद्योगसमूहाचे प्रमुख दिगंबर आगवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, लोकमतचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, नगरसेविका सौ.वैशालीताई चोरमले, रेल्वे सल्लागार समिती सदस्या सौ.वैशाली शिंदे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ.नीलिमा लोंढे, मुंबई उच्च न्यायालयातील अ‍ॅडव्होकेट विश्‍वनाथ टाळकुटे, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले, समता परिषदेचे अध्यक्ष दशरथ फुले, तुकाराम गायकवाड, बाळासाहेब ननवरे, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमीरभाई शेख, अहद सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मेहबूबभाई मेटकरी, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष समीर तांबोळी, सदाशिवराव जगदाळे, जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सिकंदर डांगे आदींनी भेट देऊन आरोग्य किटच्या उपक्रमाचे कौतुक केले. या सर्वांचे स्वागत क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे लक्ष्मण उदगट्टी, आप्पा शेंडगे, प्रकाश इनामदार यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!