दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । गोखळी । फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने सामाजिक उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संघर्ष ग्रुप संचलित ‘एकदंताय’ या सामाजिक विकास संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 75 बाटल्या रक्त जमा झाले.
धर्मादाय आयुक्तांकडे नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या ‘एकदंताय’ सामाजिक विकास संस्थेच्या नामफलकाचे मेजर संदीप शेंडगे यांच्या हस्ते फित कापून अनावरण करण्यात आले. भारतीय सैन्यदलात सेवा पूर्ण करून नुकतेच परतलेल्या मेजर संदीप शेंडगे यांचा संस्थेच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सायकलिंग, पुुशअप, दोरीवरील उड्या आदी विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल गोखळीच्या कु.स्वरा भागवत या चिमुकलीलाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बजरंग नाना खटके, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष पै. बजरंग गावडे, गोखळी चे माजी सरपंच नंदकुमार गावडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, पोलीस पाटील विकास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, खटकेवस्तीचे उपसरपंच योगेश गावडे पाटील, माजी सरपंच संतोष खटके, बॉडी बिल्डर जगदीशभैया मदने, अक्षयकुमार गावडे, सुनील अप्पा गावडे, सुनील खटके, हनुमान दहिहंडी संघाचे अध्यक्ष योगेश भागवत उपस्थित होते.
‘एकदंताय’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर चव्हाण, उपाध्यक्ष आकाश घाडगे, सचिव सुनील चव्हाण, खजिनदार विकास गायकवाड, विकास घाडगे तसेच विशाल घाडगे, निखिल गायकवाड, पप्पू गायकवाड, अक्षय चव्हाण, विशाल चव्हाण, राकेश चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
रक्तदान शिबिरासाठी शिवानंद हॉस्पिटल, बारामती, ’तर्पण’ ब्लॅड सेंटर पुणे यांचे डॉक्टर आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधेश्याम जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश धापटे यांनी केले.