स्थैर्य, पांचगणी, दि. 21 : शहरी व ग्रामिण भागाचा समतोल राखून राज्य शासनाने अनेक योजनांचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पात केला आहे. या योजनांचा लाभ समाजातील सर्वसामान्यांना कसा मिळेल याची खबरदारी शिवसैनिकांनी घ्यावी, असे आवाहन राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील हे उपस्थित होते.
शिवसेनेच्या 54 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर शहर शिवसेनेच्यावतीने येथील ग्रामिण रूग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सातारा-सांगली जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा प्रमुख गोपाळ वागदरे, अर्बन बॅकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे, महीला जिल्हा संघटक शारदा जाधव, नगरसेवक कुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री देसाई पुढे बोलताना म्हणाले, पश्चिम महाराष्ट हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र याच बालेकिल्ल्यात सातारा जिह्यात शिवसैनिकांनी दोन आमदार राज्याला दिले, राज्यात तीन पक्षाचे सरकार असले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने शिवसैनिकांची जबाबदारी वाढली आहे. महाबळेश्वर येथील शिवसैनिकांच्या पक्षसंघटन कौशल्याचे कौतुक केले . कोविड संक्रमित रूग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने अनेकांना जीवनदान देण्याचे काम शिवसैनिक करतात हे अभिमानाची बाब आहे. महाबळेश्वर हे उंचीवर वसले असून शिवसेनेलाही त्याच उंचीवर नेवून ठेवण्याचे काम येथील शिवसैनिकांनी केले आहे. भविष्य काळात देखिल येथील शिवसेने कडून असेच काम घडेल, असा विश्वासही प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केला.