स्थैर्य, अहमदाबाद, दि ६: अंडर-४० श्रीमंतांच्या यादीत देशातील आयटी हब मानल्या जाणाऱ्या बंगळुरूतील सात आणि दिल्लीतील दोन स्टार्टअप टाॅप-१०मध्ये समाविष्ट झाले आहेत. यामध्ये जिरोधा ग्रुपचे कामत बंधू, उडान ग्रुपचे आमोद मालवीय आणि सुजितकुमार, थिंक लर्न ग्रुपचे रिजू रवींद्रन, फ्लिपकार्टचे बिन्नी आणि सचिन बन्सल, ओलाचे भावीश अग्रवाल यांचा समावेश आहे. देशात एकूण १५,००० पेक्षा जास्त स्टार्टअप आहेत. स्टार्टअपच्या संख्येच्या हिशेबाने भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात सर्वात जास्त स्टार्टअप अभियांत्रिकी, एफएमसीजी, हॉस्पिटॅलिटी, रिटेल, फूड, ज्वेलरी आणि ऑटोमोबाइल यासारख्या क्षेत्रांत कार्यरत आहेत.
आयआयएफएल वेल्थ हुरून इंडियाने नुकतीच ४० अँड अंडर सेल्फ मेड रिच लिस्ट २०२० जारी केली आहे. यामध्ये ज्यांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी आणि संपत्ती १,००० कोटी रुपयांहून जास्त आहे त्यांचा समावेश केला आहे. भारत जगातील उभरत्या उद्योजकांचे प्रतिनिधित्व करत आहे. जगातील अंडर-४० रिच लिस्टच्या टॉप-१० मध्ये भारताचे नऊ श्रीमंत समाविष्ट आहेत. यापैकी सर्वात जास्त ७ श्रीमंत बंगळुरूचे, दोन दिल्लीचे,एक दुबईचा आहे. त्यांची संपत्ती ४५,००० कोटी रुपये आहे.