स्थैर्य, कोरेगाव : COVID-19 चे पार्श्वभूमीवर शासनाचे बांधावर खत वाटप योजने अंतर्गत कोरेगाव येथे कृषि विभागाअंतर्गत बांधावर खत वाटप केले. श्री भैरवनाथ शेतकरी सहायता गटाने खत वाटप योजनेअतर्गत एकत्र येऊन गावातील शेतकऱ्यांची आवश्यक खताची मागणी कृषि विभागाकडे केली.
एकूण 7.5मेट्रिक टन खताचे वाटप कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. कोरेगाव या संस्थेतून करणेत आले. यावेळी विधानपरिषदेच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल आ. शशिकांतजी शिंदे साहेब यांचा कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सहकार संस्थेचे सह.निबंधक श्री सुद्रीक साहेब,चेअरमन श्री. भागवत घाडगे ,मा चेअरमन श्री. शहाजीराव बर्गे, श्री.विध्याधर बाजारे, श्री. मनोहर बर्गे,अधिकराव माने नगरसेवक किशोर नाना बर्गे, नितीन ओसवाल, नागेश कांबळे, वसंतराव बर्गे, राजेंद्र ना. बर्गे, बाळासाहेब बर्गे, दत्तात्रय बर्गे,लक्ष्मण बा. बर्गे, प्रवीण बर्गे सर, मनोज बर्गे, नितीन बर्गे,जयवंत यादव, अमरसिंह बर्गे, विकास बर्गे, श्री. राजेंद्र येवले व्यवस्थापक कोरेगांव तालुका संघ व संघातील कर्मचारी वर्ग श्री.प्रितेश माळी, मंडल कृषि अधिकारी, कोरेगांव, बचतगट अध्यक्ष श्री. मांढरे, कृषि पर्यवेक्षक, कोरेगांव, श्री. यादव कृषि पर्यवेक्षक, श्रीमती हिमगौरी डेरे बर्गे कृषि सहायक, श्री जाधव, बीटीएम व बचत गटातील शेतकरी उपस्थित होते.यावेळी योग्य तो सोशल डिस्टन्स पाळण्यात आला.