म्हसवड येथील कोव्हीड रुग्णालयात स्टाफ न मिळाल्यास आंदोलन – आम्ही म्हसवडकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, म्हसवड दि. ७: माण तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे म्हसवड शहर व परिसरात असल्याने या रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळावा उपचाराविना कोणाचाही बळी जावु नये याकरीता शहरातील आम्ही म्हसवडकर टिम ने एकत्र येत शहरात लोकवर्गणीतुन अद्यावत असे कोव्हीड रुग्णालयात उभारले असले तरी याठिकाणी तज्ञ स्टाफ व डॉक्टर देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने सदरचे हे रुग्णालय असुन अडचण नसुन खोळंबा असे बनले आहे, सदरच्या रुग्णालयात प्रशासनाने तात्काळ तज्ञ स्टाफ व डॉक्टरांची नियुक्ती करावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आम्ही म्हसवडकर टिम ने दिला आहे.

म्हसवड शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा दररोज वाढु लागल्याने म्हसवड सह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांची सोय व्हावी कोणालाही आपला जीव गमवावा लागु नये याकरीता शहरातील आम्ही म्हसवडकर टिम ने लोकवर्गणी उभारत शहरात अद्यावत असे कोव्हीड रुग्णालय उभारले सदरचे रुग्णालय उभारताना शहरातील अनेक दानवीरांनी सर्वांची सोय व्हावी म्हणुन लाखो रुपयाच्या देणग्या दिल्या त्यातुन कोव्हीड रुग्णालयासाठी लागणार्या सर्व अद्यावत सुविधांची खरेदी करण्यात आली, आरोग्य विभागानेही येथे औषधे उपलब्ध करुन दिली मात्र याठिकाणी लागणारा तज्ञ स्टाफ अद्यापही प्रशासनाने येथे उपलब्ध करुन दिला नाही तर सदर रुग्णालय सुरु करताना याठिकाणी शहरातील सर्व खाजगी डॉक्टर सेवा देतील असे प्रशासनाने सांगितले होते, मात्र आजवर याठिकाणी शहरातील काही मोजकेच डॉक्टर सेवा बजावत असुन काहींनी तर स्पष्टपणे येथे सेवा देण्यास नकार दिला आहे. वास्तविक सदरचे रुग्णालय हे लोकवर्गणी तुन उभारलेले जिल्ह्यातील पहिले रुग्णालय असल्याने जिल्हा स्तरावरुन या रुग्णालयाचे मोठे कौतुक झाले मात्र नुसत्या कौतुकाने रुग्ण बरा होत नाही तर त्याला प्रत्यक्षात त्याला लागणार्या ट्रिटमेंटची गरज असते नेमकी हीच ट्रिटमेंट सध्या याठिकाणी मिळत नसल्याने सदरचे रुग्णालय नामधारी बनु लागले आहे. खरेतर ज्या रुग्णालयाशी सर्वसामान्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत त्या रुग्णालयाला प्रशासनाने वार्यावर सोडु नये अशी सर्व सामान्य जनतेची इच्छा असल्यानेच सर्वसामान्य जनतेचा व रुग्णांचा विचार करुनच आम्ही म्हसवडकर च्या टिमने आता पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असुन दोन दिवसांत जर याठिकाणी सर्व सुविधा तज्ञांच्या नियुक्त्या न झाल्यास मात्र आंदोलन अटळ असल्याचे म्हसवडकर टिम ने म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!