
स्थैर्य, सातारा, दि. २४ : जिल्हाधिकारी यांचा आदेशाचा भंग करून आस्थापना सुरू ठेवणार्या दहा दुकानांवर पोलिसांनी आज कारवाई करत साथरोग अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले.
याबाबत माहिती अशी, कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सध्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही उदयराज सतीश धनावडे (युनायटेड वेस्टर्न कॉलनी, अशोक बबन देवर्षी (आदिती गारमेंट शनिवार पेठ सातारा), प्रदीप शंकर झाड (गुरुवार पेठ सातारा), विशाल सोमनाथ कारंडे (शनिवार पेठ सातारा), मुकुंद पांडुरंग सुतार (गुरुवार पेठ सातारा), उमेश भजनलाल सराफ (गुरुवार पेठ सातारा), सारंग प्रकाश गुजर (सोमवार पेठ सातारा), अनिकेत संजय जोशी (सदर बाजार सातारा), प्रकाश शंकर घोरपडे (राहणार मंगळवार पेठ सातारा) आणि रोहित जितेंद्र होल राहणार पांढरवाडी सातारा हे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश मोडून आपल्या आस्थापना सुरू ठेवत होते. त्यामुळे सातारा शहर पोलिसांनी आज या दहा जणांवर कारवाई करत साथरोज अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल खाडे, अमोल साळुंखे, सुनील कर्णे, सचिन नवघणे, चेतन ठेपणे यांनी केली आहे.