स्थैर्य, भुईंज, दि.४ : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादर्भावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत किसन वीर कारखाना व्यवस्थापन अधिकारी ब कामगार वर्गाच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहे. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनाने माधव रसायन वटी ही करोना या आजारावर प्रतिबंधात्मक ब उपचाराकरिता उपयोगी ठरत असल्याने या गोळ्यांचे बाटप अध्यक्ष मदनदादा भोसले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत किसन वीर, किसन वीर-प्रतापगड ब किसन वीर-खंडाळा कारखान्यातील सर्व कर्मचारी ब अधिकाऱ्यांना करण्यात आले.
किसन वीर कारखाना परिवाराचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी कर्मचारी ब अधिकारी वर्गाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय योजना राबविल्या आहेत. माधव रसायन बटीमुळे शरीरातील जीवानावश्यक पोषक तत्व वाढण्यास मदत होते. विषाणु अथवा जीवाणूजन्य ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, वास किंवा चव जाणे व विकृत कप आदी लक्षणांवर प्रभावी काम करते. या ओषधाच्या सेवनाने पचन संस्था बळकट होऊन यकृताची कार्यक्षमता वाढते. तसेच शरिरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यापुर्वीही मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अर्सनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप, कॉलनी वब कारखाना परिसरात निर्जतुकीरण करण्यात आले आहे.
यावेळी कारखान्याच्या महिला कर्मचारी सो. शिला जाधब- शिंदे, सो. वर्षा अहिरेकर, सो. रूपाली खरे, सो.रूपाली खाडे, श्रीमती. कविता ननावरे यांना प्रातिनिधीक स्वरूपात माधब रसायन बटीचे बाटप कारखान्याचे अध्यक्ष मटनदादा भोसले, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, सेक्रेटरी नारायण काळोखे, शेखर भोसले पाटील, सचिन सांवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
माधव रसायन वटी घेण्याची मात्रा
माधव रसायन वटी रोगप्रतिरोधक मात्रेमध्ये १ गोळी सकाळी नाष्ट्यापुर्षवी पाच मिनिटे अगोदर व रात्री जेवणापुर्वी पाच मिनिटे अगोदार साध्या पाण्यामध्ये घेणे ब पाच दिवसानंतर पुढील दहा दिवस एक गोळी नाष्ट्यापुर्वी पाच मिनिटे अगोदर घ्यावी. तसेच लक्षणे आढळल्यास एक गोळी पहिले पाच दिवस सकाळी नाष्ट्यापुर्वी, दुपारी व रात्री जेवणापुर्वी पाच मिनिटे अगोदर साध्यापाण्यासह व पुढील पाच दिवस एक गोळी नाष्ट्यापुर्बी पाच मिनिट अगोदर घ्यावी.