पुसेसावळी-म्हासुर्णे रस्त्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत चोराडे (ता. खटाव) येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू


 

स्थैर्य, निमसोड, दि.५: पुसेसावळी-म्हासुर्णे रस्त्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत चोराडे (ता. खटाव) येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शुभम रमेश भोपळे (वय 21) असे मृत युवकाचे नाव आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, चोराडे येथील वाहन व्यावसायिक शुभम भोपळे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून मायणीकडे निघाला होता. चोराडे गावच्या हद्दीत चिकमहूद येथून कराडकडे तरकारी घेऊन जाणार्‍या (एमएच 15 डीके 6192) या चार चाकी वाहनाची त्याच्या दुचाकीला धडक झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भोपळे यास मिरज येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

अपघातप्रकरणी चारचाकी चालक सागर पवार याच्या विरोधात मायणी पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत. 

शुभम भोपळे हा वडूज येथील व्यावसायिक प्रल्हाद तोडकर यांचा नातू आहे. एकुलत्या एक कर्तबगार मुलाच्या निधनाबद्दल वडूज, चोराडे, निमसोड परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. शुभमवर चोराडे येथील लिंगायत स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात आई, वडील, बहीण, आजी असा परिवार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!