स्थैर्य, वडूज, सुयोग लंगडे, दि. २४ : दिनांक 22 7 20 20 रोजी नेहमीप्रमाणे कोरोना साथीच्या रोगाच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या ठिकाणावर जाऊन पेट्रोलिंग करीत असताना वडुज कडून मळवी जाणाऱ्या रस्त्यावरून वडूज कडे भरधाव वेगाने हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली येत असल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल संग्राम बाबर, शेडगे व बदडे यांनी ट्रॅक्टर चालतात ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले त्यावेळेस त्या ट्रॅक्टर ची पाहणी केल्यावर त्यामध्ये एक ब्रास वाळू आढळली तेव्हा त्या ड्रायव्हर कडे त्या वाळू संदर्भात चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतीही गौण खनिज याचे पुरावे नसल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली व चालक यांना वडूज पोलिस स्टेशनला आणले त्या चालकाकडे चौकशी केल्यावर त्यांनी ती वाळू नदीपात्रातून आणली आहे असे सांगितले तेव्हा चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला या गुन्ह्यात एक हिरव्या रंगाचा जॉन डियर ट्रॅक्टर ट्रॉली व 1 ब्रास वाळू असा मुद्देमाल मिळून आला त्याची किंमत 5 लाख 80 हजार अशी आहे वडूज पोलिस स्टेशनला नवीन कारभारी आल्यामुळे व त्याच दिवशी वाळू माफियांवर पहिली कारवाई करण्यात आली त्यामुळे वाळू माफियांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नवीन कारभारी पोलीस स्टेशनला आल्यामुळे वडूज नगरीत उत्साहाचे वातावरण आहे अनेक नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख यांचे पोलीस स्टेशनला जाऊन स्वागत केले.