
स्थैर्य, फलटण, दि. 10 : काल (दि. 9 जून) रोजी 2544 व्यक्ती फलटण तालुक्यात होम क्वारंटाईन मध्ये आहेत. त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. आज फलटण तालुक्यातील 20 जणांचे करोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून वडले ता. फलटण येथील एकाचा करोनाचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला असून २० जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. फलटण येथील करोना केअर सेंटरच्या कन्फर्म वॉर्ड मध्ये चौघे जण असून सस्पेक्ट वॉर्ड मध्ये 47 जण आहेत अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.