पाडेगाव येथे दोन गटात धुमशान : परस्पर विरोधी तक्रार दाखल


 

स्थैर्य, लोणंद, दि. 23 : पाडेगाव फार्म, ता. खंडाळा  गावच्या हद्दीत दोन गटात झालेल्या मारहाणीत परस्परांविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करून दोन्ही गटातील सर्वांना अटक करण्यात आली आहे. 

याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, पाडेगाव फार्म  गावच्या हद्दीत फिर्यादीच्या घरासमोरील जागेत राजकुमारी नवले हीने येवून आमच्या जागेत येवू नका असे म्हणुन सायकल खाली पाडून शिवीगाळ केली. तसेच मुकेश दिलीप नवले याने येवून फिर्यादीला बाहेर बोलावून तुला लय मस्ती आली आहे? का माझ्या बायकोला शिव्या देतेस असे म्हणुन फिर्यादीस वाईट हेतुने बघून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादीला सोडविण्यास जाऊ आली असता दोघींच्या पोटात व पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर राजकुमारी नवले व खुशी नवले यांनी केस धरुन मारहान करुन शिवीगाळ दमदाटी केली. 

राजकुमारी मुकेश नवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे घरासमोरील बोळीतील रस्त्यावर  विहीरीतील पाणी घेवून येत असताना सारीका नरेश नवले, हेमा सतिश नवले, भुमिका नरेश नवले, अदित्य नरेश नवले, साधना सुरेश नवले, अर्चना महेश नेतले, मिनल योगेश माचरे, इशिता रविंद्र नवले, नरेश शिवलाल नवले सर्व रा. पाडेगाव फार्म यांनी जाण्यायेण्याच्या बोळीतुन जायचे नाही असे म्हणुन लाथबुक्क्यानी मारहाण केली. ओरडण्याचा ऐकुन फिर्यादीची सासू व नणंद सोडविण्यास आली असता नरेश नवले याने लाकडी दांडक्याने सासू व नणंद यांना मारहाण केली.

या घटनेचा अधिक तपास लोणंदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी हे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!