फलटणमध्ये कस्टमर केअर मधून बोलतोय म्हणून खात्यामधून रुपये ६६ हजार ७७० रुपये लांबवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : दिनांक २७ जुलै २०२० रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान फिर्यादी राजगौरी शशिकांत कदम यांना फोन पे कस्टमर केअर मधून बोलतोय म्हणून फोन आला. सदरील फोन मध्य तुम्हाला फोन पे कडून रुपये ४२०० रिफंड होणार आहेत, ते तुम्हाला हवे असतील तर आम्ही पुढे सांगितल्या प्रमाणे लिंक मधून ट्रांजेक्शन करा. त्या प्रमाणे फिर्यादी यांनी ट्रांजेक्शन केले. व फिर्यादी यांच्या खात्यामधून रुपये ६६ हजार ७७० रुपये लांबवले. या बद्दल फिर्यादी यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून फलटण शहरासह फलटण तालुक्यामध्ये सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले असून काहीजण आपल्या इमेजच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करण्यासाठी भीत आहेत. तर काहीजणांच्या खात्यातून हजार ते पंधरा हजार रुपये पर्यंत ही रक्कम लंपास करत असून जे नागरिक नेट बँकिंग अथवा यूपीआय वापर करतात, त्यांनी यापुढे जपून व्यवहार करणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळामध्ये सायबर हल्ले वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात असून त्याचा फटका फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना व लघु उद्योजकांना बसत आहे. तरी व्यवसायिकांनी व नागरिकांनी आपण सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शक तत्त्वे यांचा पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!