स्थैर्य, दि.२: राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. अशातच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच, कोरोनाची दुसरी लाट आली तरी, राज्य सरकार पूर्ण तयारीत आहे, असेही टोपे म्हणाले.
टोपे म्हणाले की, ‘युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांमध्ये परत लॉकडाऊन करण्यात आला. या संदर्भातल्या बातम्या आपण पाहतच आहोत. आपल्याकडेही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. पण, जर कोरोनाची दुसरी लाट आलीच,तर राज्य सरकार त्या परिस्थितीशी तोंड देण्यास सक्षम आहे, असे टोपे यांनी सांगितले.