स्थैर्य, लखनौ, दि.१६: पती जिवंत असताना तो
मृत असल्याचे दाखवून शोकडो महिलांनी विधवा पेन्शन योजनेमधून देण्यात
येणा-या पेन्शनचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार
उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडला असून, प्रशासनाने आतापर्यंत अशी
१०६ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
बदायूंच्या जिल्हाधिका-यांनी या प्रकरणाची
तातडीने दखल घेतली असून, या महिलांना दिली जाणारी पेन्शन बंद करण्याचे
आदेश दिले आहेत. तसेच या महिलांना आतापर्यंत देण्यात आलेली रक्कमसुद्धा
वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रोबेशन अधिकारी संतोष कुमार यांनी
बुधवारी सांगितले की, जिल्ह्यात एकूण १०६ महिला अशा आहेत. ज्यांनी आपल्या
पतीला मृत दर्शवून पेन्शनचा लाभ घेतला आहे.