मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भाई जगताप, शेट्टी, चव्हाण यांची नावे चर्चेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि १ : महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राज्य सरकारमधील सत्तेचा वापर काँग्रेसची पक्ष संघटना वाढीसाठी करण्याची गरज असल्याचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील, तसेच मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी इच्छुक आहेत. गेल्या काही वर्षांतील मुंबई काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणाला मुठमाती देऊन मुंबईतील पक्ष संघटना वाढविण्याचा भाग म्हणून पक्षाचे मुंबई नेतृत्व बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आ.

भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आ. मधु चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, आ. अमीन पटेल, चरणसिंह सप्रा अशी नावे चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना वाढीवर भर दिला असून, मुंबईत काँग्रेसला मानणारा वर्ग काही प्रमाणात असला, तरी त्यांच्यापर्यंत संघटनेच्या माध्यमातून जाणे आणि आगामी महापालिका निवडणुकासाठी पक्षाची तयारी करणे यासाठी विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी नवीन व्यक्तीची नेमणूक व्हावी, असा काहींचा आग्रह आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मुंबईसह कोकणात दारूण पराभव झाला. मुंबईतील पक्षाची कामगिरी बरी न झाल्यामुळे माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!