कुरवली खुर्द येथे वाळू माफियांवर कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २ :  कुरवली खुर्द, ता. फलटण येथे  बेकायदेशीर वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या आठ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 14 लाख 23 हजारच्या मुद्देमाल जप्त केला असून अनिल बबन पवार, रा. जिंती नाका, ता. फलटण, आदेश जालिंदर जाधव, रा. वाठार निंबळक, ता. फलटण, विनोद रामभाऊ मदने, रा. धुळदेव, ता. फलटण, सुखदेव हिरालाल जाधव, रा. जिंती नाका, ता. फलटण, वैभव संजय निंबाळकर, रा. चिंचुर्णी, ता. फलटण, मालोजी उर्फ पप्पू बाळू जाधव, रा. जाधववाडी, ता. फलटण,  नवनाथ ज्ञानेश्वर भंडलकर, रा. तावडी, ता. फलटण, तानाजी जाधव, रा. धुळदेव, ता. फलटण अशी त्यांची नावे असून या कारवाईत १४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये वाहने आणि वाळू हस्तगत करण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली. 

 

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना केल्या होत्या. पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या होत्या. 

दि. १ जून रोजी सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दु. १२ वाजण्याच्या सुमारास कुरवली खुर्द, ता. फलटण येथील बाणगंगा धरणाच्या पात्रात छापा टाकला असता त्याठिकाणी वरील आठ जण ६ ट्रॅक्टर ट्रॉली व एक ७०९ टेम्पोच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून तिची चोरटी वाहतूक करताना आढळून आले. वाळुबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सर्वजण बेकायदेशीर वाळूची चोरी करीत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्याकडून १४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत त्यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!