
स्थैर्य, सातारा, दि. १ : वाई-खंडाळा-महाबळेश्वर चे आमदार मकरंद पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची कोरोनाची ची चाचणी पोझीटीव्ह आली आहे. उपचारासाठी ते पुणे येथे जाणार आहेत. त्यांच्या निकट सहिवासित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी केले आहे.यापूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय कबुले, त्यानंतर बाळासाहेब पाटील, जावळीचे नेते दीपक पवार यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.