युनियन बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज झाले स्वस्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, १
नोव्हेंबर:
युनियन बँक ऑफ इंडियाने ३० लाखांवरील गृह कर्जाकरिता व्याजदर १०
बीपीएसने कमी केले आहेत. महिला कर्जदारांना आणखी सवलत मिळणार असून अशा प्रकारच्या कर्जासाठी
वरील कर्जापेक्षा आणखी ५ बीपीएस सवलत मिळेल. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत गृहकर्जासाठी शून्य
प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. यासोबतच युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे कर्जाचा ताबा घेतला
गेल्यास १०,००० रुपयांपर्यंतचे कायदेशीर तसेच मूल्यांकन शुल्क माफ केले जातील.

व्याजदरातील या सवलती
१ नोव्हेंबर २०२० पासून लागू झाल्या आहेत. कार आणि शैक्षणिक कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया
शुल्क आकारले जाणार नाही. रिटेल आणि एमएसएमईंना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकेने
विविध उपक्रम हाती घेतले आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जदरांनी बँकेतील कमी व्याजदाराचा
फायदा घेत कर्जाची संधी साधावी अशी बँकेची अपेक्षा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!