ज्यांची संपत्ती दानासाठी आहे. ज्ञान चांगल्या कार्यासाठी आहे.
काळजी इतरांच्या सुखासाठी आहे. बोलणे दुसऱ्यांना
ज्ञान देण्यासाठी आहे, ती व्यक्ती तिन्ही लोकात धन्य व पावन आहे.
संपत्ती दानासाठी असावी. पण ती सात्विक , योग्य मार्गाने , कष्टाची मिळवलेली असावी. दान कुणाला करावं. मंदिरात दान करण्यापरीस ज्ञानमंदिरासाठी करावं. दाखविण्या अन् मिरवण्यासाठी दान करु नये. दानाचा मी पणा नसावा. देणा-याने फुकाचा आव आणू नये. तसेच घेणा-याने लिनता ठेऊन घ्यावं. दान मिळाल्यानतंर आपण सतकार्यासाठी वापरावे. आपल्याकडे आल्यावर दुस-याला द्यावे . घेता घेता देता यावे. यातच धन्यता आहे.
ज्ञानवंत असावे पण त्याचा गर्व नसावा. ज्ञान समाजविधायक असावे. समाजात आपल्या ज्ञानाने वैचारिक समृद्धी यावी. समाज नियंत्रण करण्यासाठी ज्ञानाचे प्रसरण झाले पाहिजे.
आपली काळजी दुस-यांसाठी असावी. आपली काळजी जेवढी घेतो. तेवढी सामाजिक जबाबदारी आपली सुद्धा आहे. काळजी घ्यावी काळजी करु नये.
बोलणे हे दुस-याला ज्ञान देण्यासाठी असावे. मोकार बोलण्यापरीस मोजके, नेमके, अचूक , मुद्देसुद असावे. बोलण्याने ज्ञानार्जन व्हावे. बोलणे हे समोरील व्यक्तीच्या कानापर्यंत नव्हे तर अंतःकरण पोहचावे.
धनवंत होणं सोप्प पण ज्ञानवंत बनणं आपल्या हाती
आपलाच शब्दप्रयोगी – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१