दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२१ | गोखळी | शेतीसाठी लागणाऱ्या कुर्हाड, कुदळ, विळा, कोयता, टिकाव, चिमटा याच्यासह लागणार्या इतर हत्यारे बनवुन विक्री करणारे कारागीर फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विविघ ठिकाणी दाखल झालेले आहेत.
मध्यप्रदेशातील ढोलाना जिल्ह्यामध्ये लोहार काम करणारे कारागीर मोठ्या प्रमाणामध्ये असतात. लोहाना जिल्ह्यामधील लोहार कारागिरी हे फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी हे दाखल झालेले आहेत.
मेहताब सोलंकी यांच्या बरोबर घरातील पाच ते सहा व्यक्ती महिला, पुरूष, लहान मुलांसह आहेत. आपल्या घरापासून सात ते आठ महिने मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकसह राज्यातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यात विंचवाच्या घराप्रमाणे आज इथे उद्या तिथे बिर्हाड बरोबर घेऊन धंद्याच्या शोधात पायपीट चालू असते.
साहित्य बनवताना पुरुषांच्या बरोबरीने महिलाही मेहनती कामे करू लागतात. आपल्या मेहनतीने तयार केलेली साहित्य विक्री करत असतात. या ग्रामीण कारागिरांची लहान मुले सात ते आठ महिने घरापासून दूर असल्याने शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून पासून कोसोनकोस अंतरावर आहेत. शिक्षणापासून वंचित राहिल्याने पोटापाण्यासाठी पिढीजात या धंद्यात अडकून पडायला सध्याच्या काळामध्ये या वस्तू उद्योजकांनी कारखान्यांच्या मार्फत बनवून बाजारपेठेमध्ये येत असल्याने आपल्या हक्काच्या रोजंदारी पासून कारागिरांना दूर राहावे लागत आहे.
शासनदरबारी त्यांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. यासारखी असंख्य कुटुंबे आहेत की स्थिरस्थावर नसल्याने त्यांची कोठे ही दप्तरी नोंद असल्याचे दिसून येत नाही. पोटापाण्यासाठी आज येथे व उद्या तेथे यामुळे शासनाच्या यादीवर नाहीत. असंख्य जाती, जमाती, शासनाच्या लाभापासून वंचित आहेत.